छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील हुसेन कॉलनी परिसरातून एका ८ वर्षीय बालकाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद रहेमतुल्ला मोहम्मद इब्राहिम
(वय ३३, रा. हुसेन कॉलनी, मूळ रा. बिहार) हे शहरात टाईल्स बसवण्याचे काम करतात. १५ मे २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा मोहम्मद अताउल्ला हा हुसेन कॉलनी गल्ली क्रमांक १ येथून जवळच असलेल्या दुकानात गेला होता. मात्र, बऱ्याच वेळानंतरही तो घरी परतला नाही. नातेवाईकांनी परिसरात व संभाव्य ठिकाणी शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला
नाही. मुलाचा शोध न लागल्याने अखेर अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची खात्री वडिलांना झाली.
त्यांच्या तक्रारीवरून शनिवारी (दि.१६) पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions









